प्रतिनिधी- मिनल गाडगे
राजगुरुनगर :- ता. खेड. सार्वजनिक वाचनालय राजगुरुनगर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संवेदनाचे देशाचे सार्वभौमत्व बळकट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी देशाच्या हितासाठी संविधान केले. राज्यघटनेमध्ये देशाचे सर्वांगीन सार्वमत्व अबाधित ठेवण्यासाठी भारताने स्वातंत्र्य मिळवल्यावर देशाची स्वतंत्र घटना असावी या हेतूने घटना समिती स्थापन करून त्याद्वारे सदर केलेला मसुद्यास मंजुरी २६/११/१९५० रोजी देशाची संविधान अस्तित्वात आले आहे आज ७५ वर्ष पूर्ण झाल्याचा अभिमान प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात आहे असे संतोष गाडेकर यांनी सांगितले. प्रास्ताविक सार्वजनिक वाचनालय राजगुरुनगर अध्यक्ष प्रमोद गानू यांनी केले. उपस्थितांचे आभार मानद सचिव राजेंद्र सुतार यांनी मानले. राजगुरुनगर सार्वजनिक वाचनालय मध्ये अनेक वाचक दररोज हजर राहणारे जेष्ठ नागरिक, महिला, पुरुषवर्ग ,तरुण वर्ग, कार्यक्रमाच्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पवन कासवा, ज्येष्ठ नागरिक सुधाकर मिडगे, दत्तात्रय भागवत, चंद्रसेन घोलप, महिला प्रतिनिधी वासंती बेलसरे, मेघना दीक्षित, वैशाली सांडभोर, कल्पना गवळी, वैष्णवी पंचरास, कल्पना रेवनकर, सर्व वाचक वर्ग व नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये संविधान दिन सार्वजनिक वाचनालय मध्ये संपन्न झाला
Share this content:
