प्रतिनिधी-उत्तम खेसे
रामसुकृत फाऊडेंशनचे आदर्श गाव दावडी येथे उद्घाटन राज्यसभा खासदार – मेघाताई कुलकर्णी यांच्या शुभहस्ते पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजक मा. आदर्श सपरपंच संभाजी घारे, उद्योजक संजय घारे, फाउंडेशन संचालक – दिपक घारे ,उद्योजक संजय घारे यांनी भाषणात सांगितले .
दावडी गाव ८ooo हजार लोक संख्या असलेले गाव राजकीय दृष्ट्या आणि शेतीतून उत्पन्न मिळऊन देणारे गाव आहे . कोणी काही दिले नाही तरी एकीच्या बळावर नागरीकांना सुविधा पुरविणारे गाव आहे .निवडणूकीच्या पलीकडे जाऊन निवडणूक संपल्या की मतभेद विसरून एकत्र होणारे आदर्श गाव आहे म्हणूनदावडी गावाची ओळख आहे. दावडी गावचे मा . सरपंच संभाजी आबा घारे यांनी आपल्या भाषणात सांगितले अनेक सेवा देणारे रामसुकृत संपर्क कार्यालय दावडी येथे सुरु केले सर्व शासकीय योजना त्यांची पुर्तता आरोग्य ‘शिक्षण , व्यवसायिक शिक्षण ,नोकरी ,शेतकरी यांना येणाऱ्या कागद पत्रांची माहिती सर्व काम फाऊंडेशनच्या माध्यमातून केल्या जातील .
रामसुकृत फांऊडेशन च्या सहकार्यातून कामे होत राहणार , कामे करत आलो आहे . हा विश्वास जनतेच्या मनात आहे . फाउंडेशन चे सर्वत्र कौतुक होत आहे .
Share this content:
