प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
पोलीस मित्र युवा महासंघ तर्फे रामनवमीनिमित्त शिर्डी श्री साई देवस्थान येथे बंदोबस्त पार पाडण्यात आला.पोलीस मित्र युवा संघ महाराष्ट्र राज्य गेले पाच वर्षापासून श्री शिर्डी साई देवस्थान येथे रामनवमी निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बंदोबस्त करण्यात आला. त्यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री प्रवीण पुरुषोत्तम बोबडे, संस्थापक सचिव सौ ज्योती निलेश पाटील हेच तेथे उपस्थित होते. त्यावेळेस त्यांचे सहकारी वैभव गुरव, मीनल गाडगे , गीतांजली भस्मे, दीपक बाबर, मयूर धावडे, सागर लोखंडकर, कीर्ती पावरा, इरफान शेख, निलोपर शेख, सुरज कांबळे, हरेकृष्ण खुळे, विजय भोंगळ, ऋषिकेश तापकीर हे सर्व उपस्थित होते. त्यावेळी शिर्डी साई देवस्थान यांच्याकडून उत्कृष्ट बंदोबस्त केल्यानिमित्त श्री भिमराज दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व श्री संदीप कुमार भोसले, प्रशासकीय अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Share this content:
