
प्रतिनिधी-उत्तम खेसे
सी बी एस ई – अभ्याक्रमातून दहावी बोर्ड न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी च्या विद्यार्थ्यांनी मारली अव्वल गुणांची बाजी !!
श्री भैरवनाथ प्रसारक मंडळ लांडेवाडी संस्था अध्यक्ष मा खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यार्थी पालक शिक्षक यांचे केले कौतुक :
128 विद्यार्थ्या पैकी 27 विद्यार्थ्यांना 90% च्या पुढे टक्केवारी पडलेले आहे . 53 विद्यार्थी यांना 80 ते 89 % गुण शेकडेवारीत प्राप्त झालेली आहे .उज्वल यशाची परंपरा कायम न्यू इंग्लिश मेडियम लांडेवाडी या शाळेने ठेवली आहे .
संस्कार , विचार , आचार ही त्रिसुत्री आणि स्वास्थ , शिस्त , अभ्यासात व्यस्त या तीन सुत्राने विद्यार्थी घडत असतो .पहिल्या पाच क्रमांकात हे सहा विद्यार्थी आले आहेत .क्र १ . वाकचौरे यश राजेंद्रकुमार : 98 80% क्र.२ : बेके आर्यन बाळू .98% क्र.३ . खेसे दर्शन रमेश 97 %
क्र . ३ काळे दिव्या महेंद्र 97 %,क्र ४ जाधव अनुष्का महेश 96. 4O% क्र. ५ . पाटिल ओजास शांताराम 96 %
या यशामागे विद्यार्थ्यांचे कष्ट , आई वडिलांनी त्यांना दिलेला अमूल्य वेळ , शिक्षकांनी प्रामाणिक पणाने केलेली शिकवणी याचे फळ आहे .
दर्शन खेसे राजगुरूनगर – ते लांडेवाडी रोजचा बसने प्रवास करून शिवाय आपल्या लहानभाऊ व लहाण बहिण याही त्याच शाळेत आहेत . दर्शन चे वडिल रमेश खेसे प्राथमिक शाळेत शिक्षक आई सौ . अनुराधा खेसे आळंदि येथे हायस्कूल शाळेत कुटुंबाची येवढी धावपळ असताना
दर्शनने एवढे गुण संपादन केले .जिद्द ,चिकाटी , वेळेत अभ्यास केला की यश हमखास मिळतेच असे दर्शन ने सांगितले . मला पुढे अे आय क्षेत्रात करिअर करायचे आहे .दर्शन चे नातेवाईक , खेसे परिवार , रा नगर शहरात कौतुक होत आहे .न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी शाळेचा बोर्ड निकालात टक्केवारीत नेहमीच मानाचा तुरा रोवला जातो . शाळेचा डंका बोलबाला आहेच .
Share this content:
