
प्रतिनिधी – मिनल गाडगे
ज्योती आधार फाउंडेशनच्या वतीने मुख्य कार्यालय आळंदी येथे हळदी कुंकाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. ज्योती आधार फाउंडेशन ही सामाजिक संस्था असुन या संस्थेचे संपुर्ण महाराष्ट्रात पदाधिकारी आहेत. संस्थेच्या वतीने हळदीकुंकू साजरा करताना ज्योती आधार फाउंडेशनच्या आळंदी व आळंदी परिसरातील सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या प्रत्येक उपस्थित महीलेला एक वस्तू भेट देण्यात आली. तसेच ज्योती आधार फाउंडेशन मार्फत हळदी कुंकवाच्या दिवशी आगळा वेगळा कार्यक्रम म्हणून आळंदी येथील गोरगरीब व बेघर यांना दर गुरुवारी आळंदी येथील इंद्रायणी तीरावरील घाटावर अन्नदान करण्याचा निर्णय संस्थापक अध्यक्ष ज्योतीताई पाटील यांनी घेतला. व त्यांच्यासोबत महाराष्ट्र संघटक प्रशांत बोबडे हे सुद्धा या कार्याला हातभार लावणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. इथून पुढे दर गुरुवारी आळंदी येथे अन्नदान चालू करण्यात येणार आहे. तरी ज्याना कोणाला अन्नदानाला मदत करायची असेल. त्यांनी ज्योती आधार फाउंडेशन ऑफिसला येऊन भेट द्यावी. असे आव्हान ज्योती आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सौ ज्योती निलेश पाटील यांनी केले आहे

Share this content:
