

प्रतिनिधी : उत्तम खेसे सर
कडूस [ खेड ]रामभाऊ म्हाळगी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कडूस शिक्षक क्षमता प्रशिक्षण २ .० टप्पा क्रमांक २ चे प्रशिक्षण पूर्ण झाले .सीबीएसई पॅटर्नअभ्यासक्रम येत्या पुढील कालावधीत पहिली ते तिसरी त्याही पुढे पुढील वर्गासाठी शिकवावा लागणार आहे .सामान्य कुटुंबातील विद्यार्थी सीबीएसई पॅटर्न अभ्यासक्रम शासकीय शाळेमध्ये शिकणार आहे .शिक्षकांना पहिले प्रशिक्षित करणे क्षमता नवीन संकल्पना शैक्षणिक साहित्य नवनिर्मिती नाविन्य कृतिशील शिक्षण यांसारखी कौशल्ये यांचा उपयोग करून बहुआयामी विद्यार्थी घडविणे .राष्ट्रीय शिक्षण धोरण आमलात आणणे . भावी विद्यार्थी कोणत्याही स्पर्धा परीक्षेला सहजपणे सामोरे जाईल व त्याच्या मनासारखे शिक्षण मिळेल .राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने हे प्रशिक्षण दिले .त्याची अंमलबजावणी शाळेमध्ये करायची आहे .रामभाऊ म्हाळगी कडूस विद्यालयात टप्पा क्रमांक ० २ मध्ये एकूण 312 शिक्षकांना प्रशिक्षण दिले .एकूण कुल ०५ करण्यात आले होते .सुलभक शिक्षक म्हणून 16 जणांची नेमणूक केली होती .18 मार्च ते 22 मार्च या पाच दिवसात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले . सर्व प्रशिक्षणार्थीयांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थापुणे व जिल्हा परिषद पुणेयांच्या संयुक्तेदमाने आयोजित केलेले शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2 . 0तालुकास्तरीय प्रशिक्षण पूर्ण केले असेप्रमाणपत्र देण्यात आलेसदिच्छा समारंभाची सुरुवात लेके सर राजलक्ष्मी लेके यांच्या सुमधूर गायनाने आणि अभंग वाणीने झाली .सदिच्छा समारंभाचे अध्यक्ष म्हणून सौ सरपंच हेमलता खळदकर यांनी भूषविले . शि . वि .मंडळ कडूसउपाध्यक्ष माऊली ढमाले शि . पा संघ अध्यक्ष चांगदेव ढमाले रामभाऊ म्हाळगी माध्यमिक उच्च्च माध्यमिक विद्यालय कडूस चे प्राचार्य अनिल पोटे सर , मुख्याध्यापक संघ खेड ता अध्यक्ष संजय बोरकर , कार्यकारी संचालक मुख्याध्यापक उत्तमराव पोटवडे ‘ पुणे शारिरीक शिक्षण सचिव , मा . अध्यक्ष क्रिडा संघटणा खेड तालुका रामदास रेटवडे , मुंढे सर, समन्वयक विजय दहिफळे समन्वयक दयानंद शिंदे , दिलीप करंडे , शिक्षक परिषद संघटना अध्यक्ष उत्तमराव खेसे , सांस्कृतिक व कला शिक्षक लेके सर , संतोष काळे सर उपस्थित होते .सुलभक संदीप जाधव सचिन नेवासकर ईश्वर वाघमारे नवनाथ कचरे रंजना सोनवणे दीपक पोखरकर सुनील धुमाळ शशिकांत जाधव जीवन गाडे विलास कवडे तानाजी कोळेकर संतोष खोपे रामदास खाटमोडे भारत शहाणे .यांनी सुलभक म्हणून काम पाहिले .यांनी प्रशिक्षणार्थींना अध्यापनाचे काम केले .या सर्व सुलभकांचे शाल श्रीफळ व कडूस शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन व शालेय विकास हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला .महात्मा गांधी विद्यालयातील प्राध्यापक गणेश तोत्रे यांनी पीएचडी प्रधान केली त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनिल पोटे सर सूत्रसंचलन दत्तात्रय येवले सरयांनी केले आणि आभार रामदास रेटवडे सर यांनी मानले .
Share this content:
