


प्रतिनिधी- मनोहर गोरगल्ले
प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगर येथे आज २५ एप्रिल २०२५ रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला.चला हिवतापाला संपवुया,पुन्हा योगदान द्या,पुनर्विचार करा,सक्रिय व्हा असे या वर्षीचे हिवताप दिनाचे घोषवाक्य घेवुन विविध ठिकाणी रॅली,सभा घेण्यात आल्या.हिवतापामध्ये थंडी वाजुन ताप येणे,घाम येणे ,तीव्र डोकेदुखी ,उलट्या ही लक्षणे दिसुन येतात.ॲनोफिलिस डासाची मादी चावल्याने हा रोग होतो .या डासांची उत्पत्ती-स्वच्छ पाण्याची डबकी,तळे,कुंड्या,नाले,भात शेती यांमधे होते.आरोग्य विभागाकडुन प्रतिबंधात्मक उपाययोजनां मध्ये-दूषित भांडी मोकळी करणे,गप्पी मासे सोडणे,
नाले,गटारे वाहती करणे,मच्छरदाणीचा वापर यांसाठी जनजागृती केली जाते.घर आणि परिसराची स्वच्छता ठेवावी. पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकणे लावावीत .कूलर,फ्रिजच्या मागील पाणी साठे दर आठवड्याला साफ व कोरडे करावेत.प्रा. आ. केंद्र राजगुरुनगर येथील सर्व वैद्यकीय अधिकारी,तालुका पर्यवेक्षक श्री रेवणनाथ ढाकणे,श्री धनंजय घोसाळकर, श्री भुषण भारती, दिपक शेलार,महेश दहिवाळ या आरोग्य सहायकांनी सदर कार्यक्रमाचे नेतृत्व केले.आरोग्य सेवक श्री चंद्रशेखर जाधव, प्रतिक गवारी,दिपक भुसारी यांनी शाळा , अंगणवाडी येथे हिवतापाबद्दल जनजागृती केली .तालुका आरोग्य अधिकारी डाॅ विलास माने यांनी सदर मोहिमेसाठी मार्गदर्शन केले ..
Share this content:
