पुणे/खेड
प्रतिनिधी दत्ता भगत
पुणे ग्रामीण जिल्हास्तरीय शालेय ते बॉक्सिंग स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी ता.आंबेगाव येथील कु. सलोनी संदीप पिंगळे हिने प्रथम क्रमांक फटकाविला आहे. विशेष म्हणजे तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तिच्या या यशाबद्दल खेड तालुक्यातून आणि गुळाणी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या कडून तिचे कौतुक होत आहे. तिला विभागीय स्पर्धे करता सदिच्छा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. न्यू इंग्लिश स्कूल , लांडेवाडीतालुका आंबेगाव येथील शिक्षकांचे तोला मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.
Share this content:
