
प्रतिनिधी-संतोष गाडेकर
राजगुरुनगर:- तालुका खेड दि .१७ शुक्रवार चांडोली येथे गरीब कातकरी समाजासाठी राजगुरुनगर मधील मैत्री ग्रुप यांनी उत्साहात कातकरी समाजासाठी गरीब महिल कुटुंबासाठी दिवाळी सणा निमित्ताने प्रत्येक वस्तीत जाऊन साड्या वाटप व दिवाळी फराळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य व लहान मुलांसाठी खाऊ वाटप करण्यात आले व कष्टकरी जीवन असल्यामुळे दिवाळी साजरी करता येत नाही. त्यासाठी त्यांची दिवाळी अत्यंत आनंदात साजरी करण्यासाठी प्रयत्न केले आदर्श जिल्हा परिषद सदस्य रोहिणी ताई बाबा राक्षे, शिवसेनेच्या जिल्हा संघटीका विजयताई शिंदे, बजरंग दलाच्या महिला संघटिका सुरेखाताई दुबे ममता ताई मानकर, साळू ताई मांजरे, मोनाली ताई सांडभोर, मिराताई कराळे, अर्चनाताई सांडभोर, वृषाली ताई जाधव, सुनिता ताई सांडभोर ,मंगलताई राक्षे मैत्री ग्रुप याद्वारे, असंख्य महिला कातकरी ,समाज बांधव, लहान मुले पुरुष वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये दिवाळी फराळ साड्या वाटप लहान मुलांसाठी दिवाळी सप्रेम भेट देण्यात आली सर्वांच्या उपस्थितीत आनंददायी वातावरणामध्ये चांडोली राजगुरुनगर येथील सर्व पक्षातील महिला ग्रुप यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी फराळ वाटप केले
Share this content:
