प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
आयुष्मान आरोग्य मंदिर राजगुरुनगर जागतिक हिवताप दिन – २५ एप्रिल २०२६ दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी हिवताप दिन साजरा करण्यात आला. या वर्षीचे घोषवाक्य ‘हिवताप दूरीकरणासाठी कटिबद्ध,आता हे शक्य आहे आता हे केलेच पाहिजे’ असे आहे .२०३० पर्यंत हिवताप दूरीकरण ध्येय साध्य करावयाचे असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या.यामध्ये ग्रामस्थांमध्ये जनजागरण, गप्पी माशांची माहिती, फलक. आदि कार्यक्रम राबविण्यात आले.
राजगुरूनगर बसस्थानका मध्ये आरोग्य सेवकांनी ध्वनिक्षेपका मार्फत सर्व प्रवाशांना हिवतापाची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार यांबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे. व डॉ अशोक मैंदाड, आरोग्य पर्यवेक्षक रेवणनाथ ढlकणे, भारती भूषण, महेश दहिवळ, शेलार दिपक यांनी मार्गदर्शन केले.
यांवेळी आयुष्मान आरोग्य मंदिर राजगुरुनगर येथील आरोग्य सेवक चंद्रशेखर जाधव, चंद्रकांत पंचरास, रोहन कोळपकर, प्रतीक गवारी, सूरज डावरे,अक्षय गव्हाणे, विकास जाधव, दिपक भुसारी यांनी कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायती तसेच नगरपरिषद राजगुरुनगर येथे गृहभेटी , डास अळ्यांचे कीटक शास्त्रीय सर्वेक्षण केले.
Share this content:
