प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
कृषीकांता आदिवासी शिक्षण संस्था कुरवंडी तालुका आंबेगाव येथील अनाथ निराधार मुलामुलींसाठी पुणे येथील किंग ग्लोबल बायोटच कंपनी( King Global Biotech Limited) शिवाजीनगर पुणे यानी किराणाकिट, धान्य, जैविक साहित्य, दिले आहे.कृषीकांता आदिवासी शिक्षण संस्था कुरवंडी तालुका आंबेगाव ही बहूजातीय मुलामुलींसाठी कार्यरथ असून आशा मुलाची दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु संस्थेला कोणतीही शासकीय मदत मिळत नसल्याने संस्थेला अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावून या मुलाचे संगोपन , शिक्षण याचं कार्य निरंतर करत आहे हेच संस्थेचे कार्य पाहून संस्थेला आयकर विभागाने आयकर सवलतीची शासकीय प्रमाणपत्र 80G, 12AA ,निती आयोग, CSR, अशी प्रमाणपत्र दिलेली आहे. परंतू संस्था ही डोगरभागात कार्य करत आहे. याच सामाजिक बांधिलकीची जान ठेवून सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई याच्या प्रयत्नांतून किंग ग्लोबल बायोटच, कंपनीच्या वतीने कृषीकांता आदिवासी शिक्षण संस्थेला किराणाकिट, धान्य, जैविक साहित्य, वाटप करण्यात आले आहे.किंग ग्लोबल बायोटच कंपनीची कृषीकांता आदिवासी शिक्षण संस्था शतशा आभारी असल्याचे संस्थापक अध्यक्षा सविताताई मते यांनी सांगितले.यावेळी त्यांनी असे आवाहन केले की या अधिवासी शिक्षण संस्थेत सर्व समाजातील मुले,मुली शिक्षण घेत असुन आपल्या कडील गरीब कुटुंबातील मुले,मुली,असतील तर त्यांना या संस्थेची माहीती देण्यात यावी तसेच समाजातील मदत करणार्या दानशुर दात्यांनी या आपल्या संस्थेला आपल्या कुवती प्रमाणे आर्थिक व वस्तु रुपाने मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.यावेळी योगेश तुपे, मनिषा राऊत, संस्था चालक अनाथाची माय सविताताई मते (महाराष्ट्र भूषण आदिवासी सेवक पुरस्कृत) वंदनाताई गवारी शिवानंद जोशीसर व संस्थेतील मुले, मुली उपस्थित होते

Share this content:
