प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
खेड तालुक्यातील राजगुरुनगर व परिसरात गुरुवारी ( दि. १६ मे रोजी ) सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची धांदल उडाली. साधारण सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरु झाला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांचा खोळंबा झाला. सकाळपासूनच वातावरणातील तडाख्याचे ऊन आणि उष्णता कमी होऊन गारवा जाणवत होता. काही ठिकाणी महामार्गाच्या लगत असलेले होर्डिंग या वादळी पावसात कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली. यामुळे पुन्हा एकदा बेकायदा होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तातडीने महामार्गावरील धोकादायक होर्डिंग हटवण्याची मागणी होत आहे. मुंबई या ठिकाणी ह्याच घटनेमुळे जीवितहानी झाली आहे ह्या घटना सांगून होत नाही त्यासाठी आपण आधीचा यावर कार्यवाही करणे गरजेचे आहे. धोकादायक होर्डिंग लावणारे आपली जाहिरात करतात मात्र सामान्य जनतेचा विचार न करता जाहिरातबाजी करतात यामुळे जर कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण ? खेड बस स्थानक, पाण्याची टाकी जवळील, हौद ओढा, चांडोली, ई. ठिकाणच्या अनधिकृत व धोकादायक होर्डिंगची परवानगी आहे का ? होर्डिंगमुळे होणाऱ्या जीवित व वित्तहानीची भरपाईची कोण देणार ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. हे सर्व अनधिकृत व धोकादायक होर्डिंग काढावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने पुणे जिल्हा उपाध्यक्ष व खेड तालुका माथाडी कामगार संघटना अध्यक्ष आकाशभाऊ डोळस यांच्या नेतृवाखाली संपूर्ण खेड तालुक्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल.असे तहसीलदार कार्यालय खेड व नगरपरिषद खेड व प्राधिकारी खेड निवेदन देण्यात आले त्याचवेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष RPl ( A) खेड तालुका माथाडी कामगार संघटना अध्यक्ष व खेड तालुका युवक अध्यक्ष तंटामुक्ती उपाध्यक्ष खरपुडी खु ।। आकाश भाऊ शांताराम डोळस ,तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत बोंबले पत्रकार हरीभाऊ बोंबले ,सोहम थोरात अनेक कार्यकरते उपस्थित होते

Share this content:
