प्रतिनिधी – संतोष गाडेकर
देहू:- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला चार वर्षे पूर्ण होत असल्याने त्या पार्श्वभूमी वर ह वेली. तालुक्यातील देहू येथील संत जिजाबाई कन्या विद्यालय सोमवारपासून दि.२२ते रविवार २८ शैक्षणिक सात दिवस आयोजन केले आहे. या शैक्षणिक सप्ताह निमित्ताने प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळेमध्ये केल्या जाणार आहे.
पहिल्या दिवशी पाणी वाचवणे, इतरांना मदत करणे. या विषयावर आधारित पोस्टर बनवणे, विज्ञान गणित या विषयावर लक्ष केंद्रित जाणार आहे. विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व सांगणे. पाण्याचे संवर्धन करणे तसेच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे असे उपक्रम राबवले येणार आहे.
विद्यालयामध्ये वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शवणारे स्टॉल मांडण्यात येतील. दि.२३ रोजी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस. शालेय पोषण आहार व त्याचे महत्त्व असे सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापिका निवेदिता पा सलकर यांनी दिली. सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्याबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून सर्व संस्था यांचा सहभाग असणार आहे.
Share this content:
