
प्रतिनिधी – डॉ. देवेंद्र ओव्हाळ
मुंबई माता बाल संगोपन केंद्र राजगुरूनगर यांच्या वतीने औंढे या गावात 10 कुटुंबाना प्रत्येकी 5 या प्रमाने 50 फळ झाडे वाटप करण्यात आले. गरीब व गरजू घरातील मुलांचे पोषण व्हावे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. संस्थेच्या माध्यमातून गावात आरोग्य , शिक्षण या सेवा पुरविल्या जातात.गावकऱ्यांना झाडे वाटतांना संस्थेच्या प्रमुख स्वाती शिंदे , आम्हाला नियमित आरोग्य सेवा देतात त्या मनीषा सुर्वे गावचे मा.सरपंच सतीश शिदें, पाटीलबुवा शिदें,वनीता शिंदे काजल शिंदे सुनीता कांबळे इत्यादी सर्व उपस्थित होते मुंबई माता बाल संगोपन तर्फे नेहमीच आमच्या गावात सुधारित आरोग्यासाठी कॅम्प घेऊन मार्गदर्शन करणे अनेक रोगांच्या तपासण्या व त्यावर गोळ्या औषधे फळ झाडे वाटप असे अनेक उपक्रम राबविल्याने गावातील अनेक गरीब गरजू लोकांना याचा खुप फायदा होतो असे मत वंचित बहुजन आघाडीचे खेड तालुका कार्याध्यक्ष दत्ताभाऊ कांबळे यांनी वेक्त केले
Share this content:
