
प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या वतीने दि.१२ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होत असलेल्या खेड तालुक्याचे सुपुत्र, विश्वसाहित्यिक ,पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाचे उद्घाटन ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.श्रीपालजी सबनीस हे करणार असून संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण,स्वागताध्यक्ष लेखक व सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे हे असून निमंत्रक राजुशेठ खंडीझोड हे आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी पहिले स्मृती साहित्य संमेलन कनेरसर येथे पार पडले होते.दुसरे साहित्य संमेलन स्वर्गीय नामदेवराव ढसाळ यांचे कर्मभुमीत होत आहे.
साहित्य संमेलन दु.२ ते सायं.६ या कालावधीत संपन्न होणार आहे.ग्रंथदिंडी,निमंत्रितांचे काव्यसंमेलन, परिसंवाद तसेच उद्गघाटक व संमेलनाध्यक्ष,मान्यवरांची मनोगते अशी संमेलनाची रूपरेषा आहे.साहित्य संमेलन स्थळास भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे साहित्यनगरी असे नाव देण्यात येणार आहे.सदर साहित्य संमेलनात लेखक अशोकराव टाव्हरे यांच्या केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कार्यावरील “विकासाचा राजमार्ग” या पुस्तकाच्या तिसरी आवृत्तीचे व “हायवे ऑफ डेव्हलपमेंट” या पुस्तकाच्या दुसरी आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे.यावेळी खेड ता.पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष संजय शेटे,उपाध्यक्ष रामंचद्र सोनवणे,सचिव किरण खुडे,सहसचिव रोहिदास होले यांचा म.भा.चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
साहित्य संमेलनास राजकीय,सामाजिक, साहित्य,शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या संयोजिका सुरेखा टाव्हरे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस संमेलनाध्यक्ष म.भा.चव्हाण, स्वागताध्यक्ष अशोकराव टाव्हरे,कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी,संयोजक दिलीपराव माशेरे
कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या सुरेखा टाव्हरे,संतोष लोहोकरे,सतिश प्रघणे,विजय कानवडे,दत्तात्रय केदारी,अर्चना प्रघणे,तुकाराम दौडकर पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
Share this content:
