


प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
खेड तालुक्यातील चाकण बीटच्या वतीने आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे पालक बालक मेळावा साजरा करण्यात आला होता .हा कार्यक्रम काळेश्वर मंदिराच्या प्रांगणात मान्यवरांच्या प्रमुख साजरा करण्यात आला. प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ICDS सुपरवायझर श्रीमती अनिता लांडे मॅडम, तसेच काळूज बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रामुख्याने यावेळी उपस्थित होत्या. तसेच यावेळी अनेक विविध उपक्रम पार पाडण्यात आले. यात प्रमुखांने मेंदूचे जाळे, वयानुसार खेळ, नवजात बालकांमधील मेंदूच्या विकासाचे टप्पे अशा विविध माध्यमांतून पालकांना माहिती देण्यात आली. आहार प्रात्यक्षिके ,सेल्फी पॉईंट, साहित्य मांडणी, करण्यात आली होती.त्याच प्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले.यावेळी वेगवेगळे तक्ते लावण्यात आले होते. गावातील सर्व घटकांना सहभागी करून घेतले .शिक्षण संस्था, ज्येष्ठ नागरिक, बचत गट ,किशोरी मुली मुले यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसत होता.
Share this content:
