

प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
दावडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री संतोष केरभाऊ सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुष्पाताई होरे यांनी ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिलाने रिक्त असलेल्या जागेवर श्री.संतोष केरभाऊ सातपुते यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी श्री माणिकराव गायकवाड ,तलाठी भाऊसाहेब श्री विनोद शिंदे ग्रामविकास अधिकारी मोहनराव गर्जे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. तसेच सरपंचपदी निवड करते वेळी सौ. पुष्पाताई होरे सरपंच, उपसरपंच धनश्रीताई कान्हुरकर, माजी सरपंच संभाजी आबा घारे, माजी उपसरपंच अनिल नेटके, राहुल कदम ,राणीताई डुंबरे ,माधुरीताई खेसे, मेघना ववले, संगीता मैंद, दादाभाऊ दुधावडे, दत्ता आंबळे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. श्री संतोष केरभाऊ सातपुते यांची दावडी ग्रामपंचायत सरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे खालील मान्यवरांनी उपस्थिती राहुन सत्कार केला.त्यात प्रामुख्याने शिवसेना जिल्हाप्रमुख भगवानशेठ पोखरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजुभाऊ शिंदे, महिला अध्यक्ष व उपसभापती ज्योतीताई आरगडे, केशव आरगडे ,युवा सेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे, तालुकाप्रमुख विशाल आप्पा पोतले, माजी सरपंच सुरेश अप्पा डुंबरे ,माजी सरपंच भाऊसाहेब होरे, अनंतराव पोचले, संदीप शेठ वाडेकर ,उज्वलाताई गोकुळे सरपंच चिंचोशी,व इतर दावडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.नवनियुक्त सरपंच पदी श्री.संतोष केरभाऊ सातपुते यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातील अभिनंदन करण्यात येत आहे.
Share this content:
