
प्रतिनिधी- मनोहर गोरगल्ले
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कोयाळी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यामध्ये कोयाळी भानोबाची येथून अनेक भाविक वारकरी पंढरपूरकडे गेले होते त्यामध्ये कोयाळी गावातील युवक किरण उर्फ सोन्या सुनील आल्हाट हा युवक देखील दिंडीमध्ये पायी चालत गेला होता. वारीच्या शेवटच्या दिवशी दिनांक पाच सात 2025 रोजी पहाटे चंद्रभागेमध्ये स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपल्या मुक्कामाच्या स्थळी येत असताना गर्दीमध्ये अचानक दहा टायर ट्रक यांचा धक्का लागून ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला, अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून संपूर्ण को कोयाळी गावा वरती शोककळा पसरली आहे हा तरुण युवक गेल्याने त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलाचे छत्र हरपले असून त्या कुटुंबाला सावरण्याची गरज आहे या कुटुंबाची परिस्थिती गरीब असून कुटुंबातील युवक गेल्याने संपूर्ण नातेवाईक ग्रामस्थ यांना मोठे दुःख झाले आहे तरी प्रशासनाने या कुटुंबाकडे लक्ष दिले पाहिजे व त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली पाहिजे अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून केली जात आहे सदर घटनेची माहिती मिळताच खेडचे आमदार बाबाजीशेठ काळे यांनी मदत करण्याची तत्परता दाखवली
Share this content:
