प्रतिनिधी : उत्तम खेसे
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील शिवे, कुडे, खरपुड भागात असलेल्या विंडोल्ड (इनरकॉन) कंपनीची चौकशी करावी, अशी मागणी विधानसभा अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी केली.
खेड मावळ तालुक्याच्या हद्दीमध्ये असलेल्या विंडोल्ड कंपनी म्हणून पूर्वी तिचे नाव इनरकॉन होते त्यावेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड केली. आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन केले जात आहे. कामकाज सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना आणि पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही कंपनी दांडगाई करत आहे. त्या ठिकाणचे जे वाहतूकदार आहेत. त्यात स्थानिकांना त्या ठिकाणी काम देण्याऐवजी इतर त्यांच्या जवळचे जे क्रिमिनल टचमध्ये असणाऱ्या लोकांना काम दिले जात आहे.
या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन असताना मोठ्या प्रमाणामध्ये ही कंपनी मशनरी लावून लेव्हलिंग करणे, रस्ते करणे, झाडे तोडणे अशी त्यांची काम चालू आहेत. मी त्यात विभागाचा आमदार असताना सुद्धा दोन-तीन वेळा आढावा बैठकी घेण्याचा प्रयत्न केला. समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात बदल होत नाही. मग हे नक्की कुणाच्या जीवावर एवढे उन्नत होऊन ही लोक काम करतात.
स्थानिकांना त्या ठिकाणी काम मिळावं त्यांनी त्यांचे काम सरळपणे करावं अशी एवढी माझी मागणी आहे आणि त्यांच्या पाठीमागे असणारे शक्तीचा या ठिकाणी शहानिशा व्हावी एवढी मंत्री महोदयांकडून माझी अपेक्षा आहे. अशी अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होते. विधानसभा सदस्य बाबाजी काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रकरणाची दखल घेतल्या जाईल आणि उचित कारवाई करण्यात येईल असे राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सभागृहाला सांगितले .
Share this content:
