

प्रतिनिधी संतोष गाडेकर
वन विभागाच्या वतीने खेड तालुक्यात वन सप्ताह १ ते ७ ऑक्टोंबर रोजी संपन्न झाला.
खेड तालुक्यांमध्ये वनविभाग अधिकाऱ्यांनी वन सप्ताह साजरा करण्यातचे आयोजन करण्यात आले होते. वन्य प्राण्यांमध्ये आढळणारे अनेक बिबट्या, तरस , वाघ अन्नाच्या शोधासाठी भटकंती करत आहेत. वन्यजीव विभागाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी शालेय स्तरावर माहिती दिली.प्राणी पश्चिम पट्ट्याच्या भागातून डोंगर ,दाट झाडी, उसाच्या शेतामध्ये फिरत आहे. कधी कधी रस्त्यावर सुद्धा दिसत आहेत. वनपरीक्षेत्र कार्यालयाच्या माध्यमातून चाकण, परसुल, राऊंड यांनी हे आयोजन केले. खेड तालुक्यांमध्ये पश्चिम पट्ट्यातील असणाऱ्या शाळा येथे अधिकारी उपस्थित होते. राजे शिवछत्रपती विद्यालय चांदुस येथील विद्यार्थ्यांनी वन्य जीव संरक्षण करण्यासाठी माहिती घेतली प्राथमिक शाळा किवळे, कुरकुंडी , आंबोली , कुडे येथील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रीमती सुवर्णा जगताप वनपरिक्षेत्र अधिकारी, श्रीमती शितल शिंदे वनरक्षक, श्री वाय सी पाटोळे, वनरक्षक, राकेश निकम, वनरक्षक वनविभाग अधिकारी कर्मचारी पश्चिम भागातील परसुल , कुडे, खरपुड या भागातील अधिकारी उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. राजे शिवछत्रपती विद्यालय येथील मुख्याध्यापक चंद्रकांत आरोडे यांनी सर्वांचे आभार मानले शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला.
Share this content:
