

प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
श्री क्षेत्र निमगाव खंडोबा हे सर्वांचे कुलदैवत असून बारा मल्हार पैकी एक आहे. येथे प्रत्येक पौर्णिमेला व रविवारी हजारो भाविक खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. निमगाव खंडोबा येथे प्रत्येक पौर्णिमेला येणार्या भाविकांना अन्नदान करण्यात येते. आज कोजागिरी पौर्णिमा असल्याने श्री गोरख खंडु पाचपुते, शिवाजीराजे कावरे ( अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष बि.जे.पी खेड तालुका ), दादासाहेब नामदेव गायकवाड, संतोष नामदेव गायकवाड, निलेश पोपट पाचपुते या भाविकांना अन्नदान करण्याचा मान मिळाला. त्यांनी प्रथम श्री खंडेरायाला नैवेद्य दाखवुन नंतर भाविकांना अन्नदान करण्यात केले. यावेळी अन्नदान करणार्या अन्नदात्यांचे खंडोबा देवस्थानच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आले. अन्नदान करण्यासाठी येणार्या प्रत्येक भाविकाला अन्नदाना बरोबर एक शुद्ध पाण्याची बॉटल देण्यात आली. अन्नदान केल्याने भावीकांच्या चेहर्यावर मन त्रुप्त झाल्याचे जानवत होते.
Share this content:
