प्रतिनिधी-संदिप गाडे
दिपावळी सणा निमित्त पश्चिम पट्टात रविवार दिनांक 19/10/2025 रोजी सायंकाळी ठिक 8 वाजता त्रिवेणीनगर आसखेड बुद्रुक येथे खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या भागात हा खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम सर्वात मोठा असून यामध्ये 24 आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत त्यात प्रामुख्याने पहिल्या 5 विजेताना मिळणार्या वस्तू. 1) नंबर – 32 इंची टीव्ही – ( सागर किसन तांबे उपसरपंच ) 2) नंबर – ओव्हण. सनी गाडे
3) नंबर – ओटर फिल्टर किशोर गाडे
4 ) नंबर – सायकल – – आकाश हुंडारे
5 ) नंबर – सायकल – यौगेश होले या मान्यवरांच्या सहकार्यातुन देण्यात येणार आहेत. अशा अनेक वस्तु बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमात भाग घेणार्या प्रत्येक महीलेला एक आकर्षक भेट वस्तु देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महीलांनी उपस्थित राहून खेळात भाग घेण्याचे आवाहन संयोजकां कडुन करण्यात येत आहे. खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम प्रसिद्ध निवेदक श्री.रुपेशशेठ वाळके करणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक. जय महाराष्ट्र मित्र मंडळ त्रिवेणीनगर यांनी केले आहे.
Share this content:
