

प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
वाकळवाडी ( खेड )
दिनांक – १७/१०/२०२५ रोजी वसुबारस या पवित्र सणाच्या निमित्ताने वाकळवाडी येथे आयोजित विशेष ग्रामसभेत इतिहास घडवणारा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात प्रथम गोवंश संरक्षणाचा ठराव एकमुखीने मंजूर करणारी ग्रामपंचायत म्हणून वाकळवाडी ग्रामपंचायतीने राज्यात नवा आदर्श निर्माण केला आहे.
या ऐतिहासिक ठरावानुसार, गावातील कोणताही गोवंश कत्तलखान्याकडे जाणार नाही, याची सामूहिक जबाबदारी सर्व ग्रामस्थांनी स्वीकारली आहे. तसेच शेतकऱ्यांना कसाई व त्यांच्या एजंटांकडून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाकड गोवंश विकायचा असल्यास तो थेट ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच विकावा, असा निर्णय घेतला गेला आहे.

ग्रामपंचायतीच्या या ठरावातून “गावाचा सन्मान, धर्माचा अभिमान आणि गोमातेचे रक्षण” या सामूहिक जबाबदारीचा पुन्हा उच्चार झाला.या प्रसंगी ग्रामपंचायत वाकळवाडीचे सरपंच नरेंद्र वाळुंज, तसेच ग्रामपंचायत गोसासी, वाफगाव, गुळाणी, चिंचबाईवाडी आणि गाडकवाडी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या ऐतिहासिक क्षणी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून भोसरी कार्यक्षम आमदार मा. श्री. महेशदादा लांडगे यांना वाकळवाडी ग्रामपंचायतीकडून गोवंश संरक्षण ठरावाचे पत्र सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आले. या वेळी महेशदादा लांडगे यांनी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “हा ठराव इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी आहे आणि राज्यभर अशाच निर्णयांचा मार्ग दाखवणारा ठरेल.”या कार्यक्रमात गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी व श्री. संतोष बारणे , श्री. निखिल बोऱ्हाडे , श्री. गणेश सस्ते , श्री. अनिकेत सस्ते यांची उपस्थितीही लाभली.
वाकळवाडी ग्रामपंचायतीचा हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी आदर्श म्हणून घ्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी व्यक्त करण्यात आली.
जय गोमाता! जय हिंदू राष्ट्र!
Share this content:
