प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले. महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटलांना न्याय हक्का साठी लढणारे व सतत पोलिस पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे व कोरोणा काळात पोलीस पाटलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणारे तसेच शासन दरबारी पाटपुरावा करुन पोलीस पाटीलांच्या मानधनात भरीव अशी पंधरा हजार रुपयांची वाढ करुन महाराष्ट्र राज्यातील पोलिस पाटलांना न्याय मिळवुन दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांचा संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून सन्मान,सत्कार तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत आह बाळासाहेब शिंदे पाटिल हे पोलीस पाटलांच्या सुखदुखःत सामील होण्यासाठी राञं दिवस संपुर्ण महाराष्ट्र दौरा करत असतात त्यांनी पोलीस पाटलांना न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचा सन्मान घाटदरे तालुका खंडाळा येथील पोलीस पाटील सौ.वर्षा किरण बोडरे यांनी श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा येथे येऊन सन्मान केला यावेळी निमगाव खंडोबा येथील चेअरमन युवराज तात्या शिंदे,माजी चेअरमन व प्रसिध्द गाडा मालक बाबाजीशेठ कोठावळे,माजी चेअरमन पंढरीनाथ हरिभाऊ शिंदे, प्रगतिशील शेतकरी काळुराम शिंदे,किरण बोडरे, प्रसिध्द गाडा मालक शिवाजी कोठावळे हे मान्यवर उपस्थित होते
Share this content:
