प्रतिनिधी- लतिफ शेख सर जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श पी एम श्री केंद्रशाळा टाकळकरवाडी शाळेचे अथर्व विजय नाईक
तनिष विजय पवार हे दोन विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशास पात्र ठरले आहेत .शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा! पीएमश्री आदर्श केंद्रशाळा टाकळकरवाडी अनेक उपक्रमांमध्ये आघाडीवर असणारी शाळा असून त्या शाळेच्या नावलौकिकात या विद्यार्थ्यांच्या यशाने भर पडली असून या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका शमिम इनामदार शेख मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील आदर्श मुख्याध्यापिका संजीवनी चिखले मॅडम व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा शिक्षक, पालक,अधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी दोन्ही विद्यार्थ्यांचे पालक श्री. विजय नाईक सर व श्री. विजय पवार सर सपत्नीक उपस्थित होते. शाळेतील शिक्षक अनिता डावरे ,सुरेश आदक, दीपक रेटवडे ,प्रगती कड, प्रगती बनकर ,मनीषा देवरे, मंदा आदक , पुनम मुळूक, सुंदर टाकळकर, आदिमाया बोऱ्हाडे ,तेजस्विनी टाकळकर, कामिनी डोके उपस्थित होते .गेले वर्षभर स्वतःच्या कुटुंबाचा वेळ देऊन , वर्षभरात एकही सुट्टी न घेता काम करणाऱ्या शमीम उस्मान इनामदार शेख मॅडम यांचे विशेष कौतुक ! मार्गदर्शक शिक्षिका आदरणीय इनामदार मॅडम
यांना सतत प्रेरणा देणाऱ्या *आदर्श मुख्याध्यापिका आदरणीय संजीवनी चिखले मॅडम व सर्व शिक्षक यांचे
खेड तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी आदरणीय अमोल जंगले साहेब विस्तार अधिकारी आदरणीय कोकणे साहेब केंद्रप्रमुख आदरणीय दत्तात्रय गोसावी साहेब आणि व्यवस्थापन समिती अध्यक्ष आकाश टाकळकर, उपाध्यक्ष ,सर्व सदस्य ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व समस्त ग्रामस्थ मंडळी टाकळकरवाडी यांनी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, व मुख्याध्यापक यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Share this content:
