प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
सध्या संपूर्ण देशात लोकशाहीचा उत्सव संपन्न होत आहे चौथ्या टप्प्याचे मतदान दिनांक 13/ 5 /2024 रोजी पार पडत असून खेड पोलीस स्टेशन हद्दीत 122 इमारतीमध्ये 189 मतदान केंद्र असून त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब यांचे सूचनेनुसार हद्दीतील शरीरा विरुद्ध गुन्हे करणार्या लोकांवर सीआरपीसी कलम 107 नुसार 1110 इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. संशयीतरीत्या फिरणार्या एका इसमावरती सीआरपीसी 109 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच गंभीर गुन्हे असणार्या 11 लोकांवर सीआरपीसी 110 ई ग प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.त्याच प्रमाणे शस्त्र बाळगून गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील 82 गुन्हेगार यांच्यावर तडीपार कारवाई करण्यात आलेली आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर 45 कसेस दाखल करण्यात आलेले आहेत. वारंवार अवैध दारू विक्री करणाऱ्या अकरा लोकांवर मुंबई पोलीस कायदा कलम 93 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणूक 2024 शांततेत पाडण्या करिता सी आय एस एफ ची शंभर जवान असलेली कंपनी 14 पोलीस अधिकारी, ३८० पोलीस जवान, 264 होमगार्ड जवाण,असे एकूण 727 अधिकारी व जवान लोकसभा निवडणूक बंदोबस्ता करिता तैनात करण्यात आलेले आहेत.नागरिकांना खेड पोलीस स्टेशन यांच्या वतीने नम्र पूर्वक आव्हान करण्यात येत आहे कि 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे मुक्त वातावरणात बजवावा लोकशाहीच्या महोत्सवांमध्ये लोकशाहीला बळकट देणारे प्रक्रिया म्हणजे मतदान आहे त्याकरिता सर्व नागरिकांनी मतदान करावे असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे तसेच सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरिता मतदान केंद्राचे शंभर मीटरचे परिसरामध्ये मोबाईल फोन व ज्वलनशील पदार्थ नेण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने 100 मीटर परिसरात मोबाईल फोन व ज्वलनशील पदार्थ घेऊन जाऊ नये. अन्यथा आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक खेड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
Share this content:
