प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातून आरोपीला पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून झम्ब्या उर्फ अन्वर शाकिर शेख असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. या बाबत सविस्तर महिती अशी कि,
दि.१२/०४/२०२४ रोजी फिर्यादी हा त्याचे मावसभावाच्या केस चे कामासाठी शिवाजी नगर कोर्टात गेला असता त्या ठिकाणी आरोपी झम्ब्या उर्फ अन्वर व त्याचा सह आरोपी ओंकार पवार व एक इतर अशे तिघे त्यांचे मोक्का च्या केस च्या तारखेला कोर्टात आले होते. आरोपी अन्वर याने फिर्यादी याचे मामाच्या मुलावर सन २०२१ मध्ये कोयते व तलवारीने वार केले होते त्या वेळी आरोपी झम्ब्या याचेवर मोक्का कायद्यान्वये कार्यवाही झाली होती त्यातून काहीच दिवसांपूर्वी झम्ब्या उर्फ अन्वर जामिनावर बाहेर आला होता. कोर्टा बाहेर फिर्यादी याला पाहून आरोपी झम्ब्या उर्फ अन्वर याने तुझे २ ३ वेळा नाटक झाले आहे असे म्हणून त्याच्या हातातील गाडीची चावी फिर्यादी याच्या कानामागे रोवली फिर्यादी खाली पडल्यावर तिन्ही आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्याने फिर्यादीस मारहाण चालू केली होती परंतु काही वेळाने आजूबाजूचे लोक जमल्याने आरोपी पळून गेले होते त्या नंतर जमलेल्या लोकांपैकी कुणीतरी पोलिसांना फोन केला होता त्या नंतर भा.द.वीचे कलाम ३०७ नुसार खुनाचा प्रयत्न करणे व इतर कलमांच्या अन्वये आरोपी झम्ब्या व इतर दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या नंतर आरोपींना अटककरून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. येरवडा कारागृहात असताना आरोपी झम्ब्या उर्फ अन्वर शेख याने अॅड.नितीन भालेराव यांच्या मार्फत पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपी आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.के.पी.नांदेडकर साहेबांच्या कोर्टाने आरोपीस अटी व शार्थींवर जामीन मंजूर केला आहे अशी माहिती आरोपीचे वकील अॅड.नितीन भालेराव यांनी दिली या कामी अॅड.मयूर चौधरी, अॅड.मिथिल बुरांडे, अॅड.स्वप्नील दाभाडे, अॅड.दीपक खेडकर यांनी मदत केली.
Share this content:
