प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
पोलीस मित्र संघाच्या नावाखाली पोलीस मित्र महासंघाच्या नावाखाली पोलीस मित्राकडून नागरिकांची लुटमार होत असल्याने त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस मित्र युवा महासंघाचे (रजिस्टर:००००५१९/२०२४)संस्थापक अध्यक्ष प्रवीण बोबडे व संस्थापक सचिव ज्योती पाटील यांनी निवेदनाव्दारे नागरिकांना केले आहे.
सध्या शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन पोलिसांच्या कामावरील असणारा ताण लक्षात घेऊन पोलीस गृहखात्याच्या वतीने पुणे पाठोपाठ पिंपरी_चिंचवड पोलीस आयुक्तालय काही वर्षापूर्वीच तयार झाले असले तरी पण काही कारणास्तव अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस संख्याबळ कमी दिसून येत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांना देखील वाढत्या कामातून सुटका मिळत नसल्याचे चित्र अनेक पोलीस स्टेशन हद्दीत दिसून त्यातच गणपती,नवरात्र या दिवसात तर पोलिसांच्या कामाचा बोजा एवढ्या प्रमाणात वाढत आहे की,या काळात त्यांना थोडा आराम करणे देखील अवघड होऊन बसते.त्यामुळे पोलिसांचा कामावरील ताण कमी होण्याच्या उद्देशाने शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत होमगार्ड पाठोपाठ पोलीस संघटना उभारून अशा संघटनेच्या माध्यमातून पोलिसांना थोडाफार हातभार लाभत असल्यामुळे पोलिसांनी थोडासा सुटकेचा श्वास सोडला असल्याचे पाहायला मिळत असतानाच यामध्ये तोतया पोलीस मित्रांची टोळीच नावारुपास येत असल्याचे पाहायला मिळत आहे.यापूर्वी तोतया पोलीस कर्मचारी,तोतया पोलीस अधिकारी अशी विविध बनावट प्रकरणे पोलिसांनी उजेडात आणली असताना आता तोतया पोलीस मित्रांनीच यामध्ये भर पडून पोलिसासमोर एक नव्याने आव्हानच उभे राहिले आहे.कारण असे स्वतःला पोलीस मित्र महासंघाचे आपण सदस्य असल्याचे सर्वसामान्य नागरिकांना भासवत असून अडचणीत सापडलेल्या नागरिकास तुमचे पोलीस स्टेशनचे प्रकरण मिटून देतो असे भासवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे प्रकार उजेडात येऊ लागले आहेत.त्यामुळे नागरिकांची देखील आर्थिक फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे नागरिकांची होणारी फसवणूक व लुटमार थांबविण्यात यावी.याकरिता पोलीस मित्र युवा महासंघाच्या वतीने,दिघी,आळंदी,चाकण, महाळूगे पोलीस स्टेशनला निवेदन देऊन बनावट तोतया पोलीस मित्रावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.यादरम्यान महासंघाच्या संस्थापक सचिव ज्योती पाटील,खजिनदार बाळासाहेब ठाकूर, महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीस संगीता नाईकिरे,उपकार्यध्यक्ष संगीता कड,जिल्हा सचिव साक्षी नवले,भोसरी अध्यक्ष मयूर धावडे, करिष्मा काळे,संगीता नानेकर आदी पदाधिकाऱ्यांच्या वतीने या भागातील विविध पोलीस स्टेशनला महासंघाच्या वतीने निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.


Share this content:
