पुणे
प्रतिनिधी – विजय धादवड
जय भवानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मोहन नगर चिंचवड पुणे १९ येथे सन २००८- २००९चा एसएससी चा वर्ग १६ वर्षांनी पुन्हा भरला यावेळी अनेक माझे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .आपल्या मनोगतांमध्ये त्यांनी शिक्षका विषयीचा आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली . विद्यालयासाठी जी काही शैक्षणिक मदत लागेल त्यासाठी सर्वांनी सर्व आम्ही एकत्र येऊन प्रयत्न करू अशा प्रकारचे आश्वासन दिले. यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव गणेश भाऊ दातीर, मुख्याध्यापक शुक्राचार्य होरे, शिक्षक संपतराव वळसे, सोमेश्वर त्रिंबके ,शिक्षिका शबनम शिकलगार ,संगीता सोनवणे, संगीता शेडगे आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा सर्वांचा सन्मान विद्यार्थ्यांनी केला. या समयी संपतराव वळसे यांनी विद्यार्थ्यांना पुढील भावी वाटचालीस सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी विद्यार्थी निलेश खिलारे, निलेश मोरे, जितेंद्र भांडेकर, महेश गायकवाड, रोहित कदम ,किरण कदम, विकास सावंत, महेश काळे ,वासुदेव दौंडकर, विनोद गायकवाड ,विशाल कांबळे ,विकी वाघमारे, विशाल पवार, विशाल भालेराव, नीलिमा ठोंबरे, पूजा चव्हाण, किरण ढवळे ,करिष्मा शिंदे, आशा गायकवाड, मोनाली देवळे उपस्थित होते सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर स्नेहभोजनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.सोळा वर्षांनी एकत्र आल्यामुळे सर्व माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण दिसून आले.

Share this content:
