प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
पुणे.
दि.२४/०६/२०२४
पद्मश्री अॅड. उज्वल निक्कम यांना राज्यसभेवर खासदार म्हणून नेमण्यात यावे या करिता पुण्याचे वकील देणार उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना देणार निवेदन या करिता आज वकिलांनी निवेदण देणे करिता शिवाजी नगर कोर्टात सह्यांची मोहीम राबवण्यात आली. या बाबत सविस्तर माहिती अशी कि,
सन २०२४ च्या लोकसभा निवडणूक मध्ये भाजप पक्षा तर्फे मुंबई उत्तर या मतदार संघातून मा. अॅड. उज्वल निक्कम यांनि निवडणूक लढली होती. या निवडणुकीत मा. अॅड. उज्वल निक्कम यांनी चुरशीची लढत दिली, परंतु अल्पश्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. मा. अॅड. उज्वल निक्कम ह्यांनी महाराष्ट्र राज्या करीता सरकार पक्षाच्या बाजूने विशेष सरकारी वकील म्हणून बरेच खटले लढले असून न्यायदानाच्या कामात त्यांचा विशेष सरकारी वकील म्हणून मोठा वाटा राहिला आहे.
या पूर्वी मा.उज्वल निक्कम यांनी महाराष्ट्र सरकार तर्फे गुलशन कुमार खून प्रकरण १९९७, खैरलांजी हत्याकांड २००६, कोपर्डी बलात्कार प्रकरण २०१४ , १९९१ कल्याण बॉम्ब-ब्लास्ट, १९९३ बॉम्बे-ब्लास्ट, २००३ गेट वे ऑफ इंडिया बॉम्बे-ब्लास्ट, २००८ मुंबई हल्ले अश्या प्रकारच्या अनेक मोठ्या केसेस मध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम केले आहेत. त्यांच्या या कामाची पावती म्हणून सरकारने या पूर्वी मा. अॅड उज्वल निक्कम सर यांना सन २०१६ मध्ये मानाचा “पद्मश्री” हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. मा. अॅड. उज्वल निक्कम यांचा कायद्याचा अभ्यास आणि कायदेविषयक क्षेत्रातील अनुभव दांडगा असून मा. उज्वल निक्कम सरांची नियुक्ती आपल्या भाजप पक्षाद्वारे राज्यसभेवर झाल्यास मा. उज्वल निक्कम सरांच्या कायद्याच्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्रातील तसेच देशातील नागरिकांना होणार आहे या करिता पुण्यातील वकिलांचा समूह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत त्या करिता सह्यांची मोहीम आज पुणे येथील शिवाजीनगर कोर्टात घेण्यात आली अशी माहिती अँड.नितीन भालेराव यांनी दिली.
Share this content:
