प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई भिडे यांचा असा मानस होता.की इंग्रजी भाषेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड तयार होतो.त्या विषयाची भिती निर्माण होते.परिणामी इंग्रजी शिकण्याचा कल कमी होतो. या विषयाची आवड निर्माण व्हावी या साठी इंग्रजी व्याकरण इंग्रजी,मराठी पुस्तक,लेखक प्रज्ञा पंडित यांचे इंग्रजी माझ्या खिशात पुस्तकांच्या मुलांना दोन लाख प्रती मोफत वाटप करण्यात आल्या .आपल्या गावातील मुलांचे इंग्रजी सुधारावे,इंग्रजी विषयाचे ज्ञान मिळावे त्यांना ही पुस्तके मिळावीत म्हणून कनेरसरचे भुमीपूत्र श्री वसंतराव कानडे, श्री शिवाजीराव कानडे या बंधूचे मोलाचे सहकार्य लाभले.शाळेसाठी दोनशे पुस्तकांचे वाटप करण्यात आले या पुस्तक वाटप प्रसंगी सामाजिक
कार्यकर्ते श्री पंढरीनाथ महादेव दौंडकर, श्री गणेश शांताराम खरपुडे,श्री वसंतराव विठ्ठलराव कानडे, श्री. शिवाजीराव विठ्ठलराव कानडे, शाळेतील शिक्षक श्री फकिरा पोखरकर, मुख्याध्यापिका श्रीम. अंजली शितोळे,श्रीम.सारिका राक्षे,श्रीम शुभांगी जाधव, श्री.संदिप म्हसुडगे उपस्थित होते.या उपक्रमाचे कौतुक खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री.अमोल जंगले साहेब, केंद्रप्रमुख सौ.कल्पना टाकळकर मॅडम यांनी केले.
Share this content:
