
प्रतिनिधी – दत्ता भगत
खेड तालुक्यातील शिरोली,खरपुडी,निमगाव ,रेटवडी , दावडी काळूस,गोसासी, गुळाणी, वाफगाव आणि या परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पावसाने दडी मारल्यामुळे कांदा लागवड जोमात सुरू आहे. खरपुडी बुद्रुक ता. खेड येथील प्रगतशील शेतकरी मा. सरपंच दिलीप धोंडीभाऊ भगत यांनी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करत आहे . यासाठी त्यांनी एक महिन्यापूर्वीच कांद्याचे बियाने टाकले होते. मग आता त्या बियाण्यांचे रूपांतर रोपात होऊन लावण्यासाठी आलेले आहे. शेती कामासाठी मजूर मिळत नाही, वाढलेली मोलमजुरी ,बी बियाणे, खतांचे वाढलेले भाव, अवलाकाळी पाऊसाने लावलेली हजेरी यामुळे कांद्याचे रोप उगवण्यास फटका बसलेला आहे. त्यामुळे रोपांचे भाव तेजीत आहे. एक एकर कांद्या लागवडीसाठी नऊ ते दहा महिला एक दिवसात लागवड करतात. या एक एकर साठी कमीत कमी तीस ते पस्तीस हजाराच्या दरम्यान खर्च येतो असे हर्षद भगत यांनी सांगितले.कांदा पिकाला योग्य असा भाव प्रशासनाने हमीभाव द्यावा अशा प्रकारच्या अभावना शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Share this content:
