

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील वराळे मधील सी. आय. ई. ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड. गिअर्स विभाग, वराळे यांचे वतीने संत लीलाभूमी सिध्दबेटात विविध देशी वृक्षांचे वृक्षारोपण करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनाचे कार्यात कामगारांनी सहभागी होत वृक्षारोपण उत्साहात करीत पर्यावरण संवर्धन कार्यास गती देण्यात आली. या प्रसंगी केळगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच किरण मुंगसे, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष वृक्ष मित्र अर्जुन मेदनकर, सी. आय. ई. ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड. गिअर्स विभाग, HR मॅनेजर अभिषेक मजली, HR ऍडमिन हरिश्चंद्र गायकवाड, यूनियन कमिटी अध्यक्ष राहुल पाटील, सेक्रेटरी उमेश ठाकरे, उपाध्यक्ष राकेश नलावडे, सचिव कपिल दाभाडे, खजिनदार संदीप तितवेकर, सदस्य संदीप बोदडे, तुकाराम पाटील, तुकाराम महाराज ताजणे, भागवत काटकर, किरण कोल्हे, बाबासाहेब ठाकूर, कैवल्य टोपे, वैभव दहिफळे, मारुती साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. संत लीला भूमी सिद्धबेटचे महत्त्व सांगत तुकाराम महाराज ताजणे यांनी आळंदीतील स्थान माहात्म्य वर्णन करीत संवाद साधला, येथील वृक्ष संवर्धन मोहिमेत सहभागी झाल्या बद्दल स्वागत करीत आभार मानण्यात आले. यावेळी भागवत काटकर, तुकाराम महाराज ताजणे, यूनियन कमिटी अध्यक्ष राहुल पाटील, सेक्रेटरी उमेश ठाकरे यांनी मनोगते व्यक्त करीत वृक्ष संवर्धन मोहिमेत कायम सहभागी होण्याची ग्वाही दिली. समन्वयक वृक्ष मित्र अर्जुन मेदनकर, उपसरपंच किरण मुंगसे यांनी संयोजन केले.
Share this content:
