प्रतिनिधी – संदीप गाडे
खेड तालुक्यातील आसखेड बुद्रुक येथील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते ह भ प रामचंद्र महाराज तरडे यांचे शुक्रवार दिनांक २९/११/२०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ह.भ.प.रामचंद्र तरडे महाराज यांच्या निधनाची वार्ता कळताच आसखेड बुद्रुक गावावरती शोककळा पसरली आहे तरडे महाराज हे गावात विविध कार्यक्रमांमध्ये नेहमी हिररीने भाग घेत असत. गावातील अखंड हरिनाम सप्ताहाची सर्व सूत्रे तरडे महाराज स्वीकारत असत. तसेच गावातील यात्रा असो वा इतर कुठलाही धार्मिक कार्यक्रम त्यामध्येही त्यांचा नेहमी सहभाग असायचा ते अनेक ठिकाणी प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून जनतेची सेवा करत होते त्यांच्या पश्चात तीन बहिणी एक भाऊ पुतणे असा मोठा नात्यागोत्याचा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कै. ह. भ. प. पोपट महाराज तरडे यांचे पुतणे आहेत.
Share this content:
