प्रतिनिधी संतोष गाडेकर
खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय शेटे यांची निवड बिनविरोध करण्यात आली.त्यांचा सन्मान शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमुख माननीय बाळासाहेब ताये व पत्रकार संतोष गाडेकर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. खेड तालुका पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेड पंचायत समिती येथे राजा शिवछत्रपती सभागृहात 26 जानेवारी रोजी संपन्न झाली माननीय अध्यक्ष संजय तुकाराम शेटे ( लोकमत) यांची निवड निवड करण्यात आली खेड तसेच नवीन नियुक्ती केलेले तालुक्यातील पदाधिकारी पुढील प्रमाणे पत्रकार रोहिदास घाडगे ( कार्याध्यक्ष) किरण खुडे ( सचिव) उपाध्यक्ष रामचंद्र सोनवणे , निलेश आंधळे उपाध्यक्ष सहसचिव रोहिदास होले, कोषाध्यक्ष आदेश भोजने, सह कोषाध्यक्ष अशोक कडलक, प्रसिद्ध प्रमुख इसाक मुलानी, सल्लागार दत्ता भालेराव, सुनील थिगळे, बाळासाहेब सांडभोर, विद्याधर साळवे, राजेंद्र लोथे, संदीप मिरजे, कार्यकारणी सदस्य नाझीम इनामदार, अतुल भालेराव, सदाशिव अमराळे, किशोर गिलबिले, सोमनाथ नवले सुभाष लो होट, रवी साकोरे, निवृत्ती नाईकरे, सर्व नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ नियुक्त करण्यात आले. यावेळी पत्रकार संतोष गाडेकर यांनी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ खेड तालुका यांच्या वतीने भावी वाटचालीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Share this content:
