
प्रतिनिधी – मिनल गाडगे
ज्योती आधार फाउंडेशन महाराष्ट्र संघटक श्री प्रशांत बोबडे यांच्या संकल्पनेतून अन्नदान वाटप करण्यात आले. आळंदी श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या दर्शनाकरता दर गुरुवारी आळंदीत खूप गर्दी होत आहे. त्या लोकांसाठी दुपारी जेवणाची सोय म्हणून ज्योती आधार फाउंडेशन चे महाराष्ट्र संघटक श्री प्रशांत बोबडे व त्यांचे सहकारी अजय मेटकर व त्यांचा मित्रपरिवार यांच्या माध्यमातून दर गुरुवारी भावी भक्त व गरीब लोकांकरता अन्नदान ठेवण्यात आले आहे. आज गुरुवारी अन्नदान झाल्यानंतर श्री प्रशांत बोबडे यांनी सर्वांना आवाहन करत मदत करण्यास सांगितले. त्यावेळेस ज्योती आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सौ ज्योती निलेश पाटील, संस्थापक खजिनदार सानिया शिरसागर, संस्थापक सचिव प्रवीण बोबडे, महाराष्ट्र सचिव महिला आघाडी सौ मीनल घाडगे, पुणे जिल्हा युवा महिला आघाडी अध्यक्ष कुमारी नम्रता धोंडे, पुणे जिल्हा संघटक महिला आघाडी कविता काढणे, आळंदी शहराध्यक्ष महिला आघाडी सौ स्वाती कुऱ्हाडे, चाकण सदस्य महिला आघाडी अर्चना सारफळे हे सर्व ज्योती आधार फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री शशिकांत राजे जाधव व प्रशांत बोबडे व अजय मिटकर मित्रपरिवार उपस्थित होते.
Share this content:
