




प्रतिनिधी -दत्तात्रय टाकळकर
शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीची वार्षिक आढावा बैठक दिनांक:०२/०२ /२०२५ रोजी चाकण येथील कार्यालयात पार पडली.
यावेळी प्रामुख्याने संघटना वाढीसाठी आवश्यक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच कोअर कमिटीचे निष्क्रिय सदस्य यांच्या रिक्त पदांची पुर्नरचना करण्यात आली.तसेच शिवशंभू छावा प्रतिष्ठानच्या विविध पदांसाठी नव्याने निवडी करण्यात आल्या.यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष महिला आघाडीपदी रेणुका मासेकर तर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी चंद्रकांत खैरे यांची निवड करण्यात आली.तर पुणे जिल्हा सचिव पदी निलेश वाघमारे. आंबेगाव तालुका वाहतूक आघाडी पदी समदभाई शेख तर चाकण शहर अध्यक्ष पदी लहूशेठ लांडे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी व संस्थापक अध्यक्ष आदरणीय भरतशेठ पवळे, महाराष्ट्र राज्य सचिव मनोहरजी गोरगल्ले साहेब, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा लताताई ढमाले, सविताताई गारगोटे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब शितकल, पश्चिम महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथाकोअर कमिटी सदस्य सचिन राक्षे, पुणे जिल्हा अध्यक्ष तथा कोअर कमिटी सदस्य: दत्ता टाकळकर , कोअर कमिटी सदस्य बबनशेठ चौधरी उपस्थित होते. मिटिंगच्या सुरवातीला शिवशंभू छावा प्रतिष्ठानचे दिवंगत कोअर कमिटे सदस्य स्वर्गीय कैलास भुरुक यांना सर्व पदाधिकार्यांनी दोन मिनिटे उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली व नंतर मिटिंग सुरू करण्यात आली. शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र ही सामाजिक संस्था असून या संस्थेचे संपूर्ण महाराष्ट्र पदाधिकारी असुन हे पदाधिकारी सामाजिक व कोणावरही अन्याय झाल्यास त्यास न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळी पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.बाळासाहेब शितकल व पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय टाकळकर यांनी संघटनेची चांगली बाधणी करुन पदाधिकार्यांची चांगली टिम तयार केल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.शिवशंभू छावा प्रतिष्ठानचे पुन्हा महाराष्ट्र भर नवीन पदाधिकारी नियुक्त करुन पुन्हा जोमाने काम करण्याचे या मिटिंगमध्ये सर्वानुमते ठरविण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व संचालक यांच्या वतीने सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी तसेच शिवशंभू छावा प्रतिष्ठानचे सदस्य यांचे आभार तसेच अभिनंदन संस्थापक सचिव माननीय मनोहर गोरगल्ले यांनी मानले.
Share this content:
