


प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
पंचायत समिती खेड महिला व बालकल्याण विभाग व पर्णकुटी अनाथ महिला व बाल आधार केंद्र रेटवडी या संस्थेच्या विद्यमाने शिरोली येथील जाखमाता मंगल कार्यालयात किशोरवयीन मुली व महिलांसाठी जेंडर आरोग्य, कुटुंब नियोजन व कायदेविषयक एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री अमित लोंढे विस्तार अधिकारी पंचायत समिती खेड,श्री नामदेव बांगर विस्तार अधिकारी पंचायत समिती खेड,श्री शरद भालेकर संस्थापक अध्यक्ष पर्णकुटी अनाथ महिला व बाल विकास केंद्र रेटवडी,श्री मनोहर गोरगल्ले प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघ अध्यक्ष खेड तालुका , श्री सुभाष जगताप प्रकल्प संचालक, सौ प्रिया गायकवाड सचिव पर्यवेक्षिका प्रकल्प १/२ च्या सर्वांच्या हस्ते करण्यात आले. श्री शरद भालेकर यांनी प्रस्ताविकामध्ये सदर कार्यक्रम घेण्यामागील उद्देश व गरज अवश्यक्तेबाबत आपले मत व्यक्त केले. पर्यवेक्षिका श्रीमती आरती गोतमारे यांनी आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे या बाबत मार्गदर्शन केले. तर श्री अमित लोंढे यांनी महिलांवरील अत्याचार याबाबत केलेले कायदे याबाबत आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते श्री सूर्यकांत शिवले यांनी विषयाची मांडणी करत असताना स्त्री पुरुष समानता, आरोग्य चांगले राहण्यासाठी दिनचर्या ,मासिक स्वास्थ्य तसेच परसबागेचे महत्त्व अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले. सौ मनीषा परदेशी मॅडम यांनी सॅनिटरी पॅडचे महत्त्व महिलांनी घ्यावयाची काळजी व बॅड टच,चागला आहार याबाबत विविध खेळांद्वारे उपस्थितांना प्रात्यक्षिकांने समजावून सांगितले त्याच प्रमाणे अॕड. वंदना धुमाळ यांनी महिलांना विविध कायदे बाबत माहिती देत असताना त्या कायद्याचा गैरवापर होणार नाही याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. त्याच प्रमाणे अॕड. तिलोत्तमा राऊत यांनी सुद्धा कायदा आणि महिलांचे हक्क ,कर्तव्य व जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या सदर कार्यक्रमास बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सारिका देशमुख मॅडम कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याबाबत सूचना दिल्या. बालविकास प्रकल्प अधिकारी श्री अनिकेत पालकर साहेब यांनी आपले मत व्यक्त करताना फक्त महिलांचे सक्षमीकरणा बरोबर आरोग्य व लिंगभेद इत्यादीवर सुद्धा भर दिला पाहिजे असे प्रतिपादन जेकेले.संस्थेच्या संचालिका वशिया सिकीलकर मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्याच बरोबर रेश्मा शिंदे मॅडम, निखिल भालेकर, काजल गायकवाड ऋषभ मिरजे यांनी सुद्धा आपले सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली. सदर कार्यक्रमासाठी खेड तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.यावेळी एकूण सहाशे महिला सहभागी झाल्या होत्या. सदर कार्यक्रमासाठी जाखमाता मंगल कार्यालयाचे अध्यक्ष संचालक यांनी या कार्यक्रमासाठी जागा व हॉल लाऊड स्पीकर व इतर सुविधा विना मोबदला उपलब्ध करून दिल्या होत्या .कार्यक्रमाचा समारोप सुभाष जगताप व श्रीमती सुवर्णा जाधव परिवेक्षिका यांनी सर्वांचे आभार मानून दिवसभरात झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत सांगून सामारोप करण्यात आला.





Share this content:
