

प्रतिनिधी : उत्तमराव खेसे.
दावडी [ खेड ] : साडेतीनमुहूर्तावर गुढीपाडवा एक शुभ मुहूर्त आहे . मराठी वर्षाची नवीन सुरुवात आहे .प्रसिद्ध बागायतदार म्हणून दावडी गावाची ओळख आहे .या शुभमुहूर्तावर ,दत्तात्रय बबन गाडे ,प्रशांत दतात्रय गाडे , भूषण दत्तात्रय गाडे .यांनी राजमुद्रा ऍग्रो सर्व्हीसेस या नावाने रासायनिक खते बी बियाणे पिकांसाठी लागणारी औषधे याचे दुकान सुरू केले आहे . ही एग्रो सेवा दत्तात्रय गाडे पाटील यांनी आपली लाडकी नात राजमुद्रा आशुतोष लोखंडे यांच्या नावाने सुरु केली आहे .उद्घाटन प्रसंगी जिल्हा सदस्य प्रिंट मिडीया डिजिटल पत्रकार संघ श्री उत्तमराव खेसे मा . उपसरपंच हिरामणशेठ खेसे राजमुद्रा चे आई वडिल ‘आशुतोष लोखंडे बाजीरावशेठ बोत्रे भानुदास खेसे सखाराम खेसे आदित्य खेसे बबनराव गाडे , सौ हौसाबाई गाडे सौ अरुणा गाडे उपस्थित होते .राजमुद्रा ॲग्रो सर्व्हीसेस ला अनेक मान्यवर व शेतकरी यांनी भेट देऊन गाडे परिवाराला हार्दिक शुभेच्छा दिल्या .
Share this content:
