

राजगुरुनगर:- खेड तालुक्यांमध्ये ग्रामदैवत श्री भोपळबुवा महाराज व श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टच्या व ग्रामस्थ नगरपरिषद विविध सामाजिक धार्मिक संस्था व राजगुरुनगर सर्व गाडा मालक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते खेड तालुक्यांमध्ये श्री भोपळबुवा महाराज मंदिर हे अतिशय प्राचीन आहे येथे पारंपारिक पद्धतीने बैलगाडा घाट, येथे दि २७ व दि २८ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले खेड तालुक्यातील व महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीमध्ये गाडा मालक सहभागी झाले होते याचे सर्व नियोजन यात्रा कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री हिरामण साहेबराव सातकर पाटील व ज्येष्ठ प्रमुख यात्रा कमिटी प्रमुख नानासाहेब टाकळकर व त्यांचे सर्व सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र भाऊ थिगळे सर्व नियोजन केले होते दि २७ रविवार सकाळी मांडव डोहाळे देवांचा अभिषेक पूजन करण्यात आले
बैलगाडा शर्यतीचे सकाळी उद्घाटन खेड तालुक्याचे आमदार माननीय बाबाजी शेठ काळे साहेब (खेड -आळंदी विधानसभा) माजी आमदार माननीय श्री दिलीपराव मोहिते पाटील यांच्या हस्ते घाटाचे पूजन व बैलगाडा शर्यतीची सुरुवात करण्यात आली रविवार दि २७ संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशा मंडळाचा कार्यक्रम गढई मैदान येथे झालाराजगुरुनगर येथे ग्रामस्थ मा. खंडू शेठ थिगळे भाऊ भालेकर विनायक घुमटकर , वैभव नाईकरे विजय डोळस समीर आहेर, रेवन थिगळे नरेंद्र थिगळे अनिल कहाने अशोक दुगड संतोष गाडेकर , नामदेव कुंभार, राहुल पिंगळे, सर्वांचे सहकार्याच्या माध्यमातून वर्गणीदार, कार्यकर्ते , राजगुरुनगर नगरपरिषद व माजी सरपंच व उपसरपंच कृषी उत्पन्न बाजार समिती, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक, विविध संघटना तरुण मंडळे यांचे सहकार्य मिळाले ग्रामस्थ महिला पुरुष लहान मुले युवक वर्ग यांनी मिठाई, लहान मुलांसाठी खेळणी विविध आकर्षक वस्तू खरेदी विक्री यात्रे मध्ये सुरु होते.यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न करण्यात आला यात्रेला खेड पोलीस स्टेशन यांचे अनमोल सहकार्य मिळाले दिनांक २९ मंगळवार जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख यांच्या सहकार्यातून महाराष्ट्रातील विविध कुस्तीगीर संघटना खेड तालुक्यातील कुस्तीगीर नामांकित पैलवान उपस्थित होते सर्वांनी आखाड्या मध्ये सहभागी व्हावी यात्रेची शोभा वाढवावी असे यात्रा कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री हिरामण सातकर पाटील माहिती दिली यावर्षी सलग तीन दिवस यात्रेचे नियोजन झाले आहे सर्वांचे सहकार्य मिळत आहे
खेड तालुक्यामध्ये श्री भोपळबुवा महाराज यात्रा कमिटी यांनी नियोजन केले. राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक व्यापारी कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार संघ खेड तालुका विविध संस्थांच्या माध्यमातून यात्रेमध्ये सहकार्य मिळाले यात्रा यशस्वी करण्यात आली
Share this content:
