

प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले मौजे पाईट रौंधळवाडी या ठिकाणी भामा आसखेड धरणाच्या कडेला मासेमारी करणाऱ्या युवकाच्या अंगावर आज सोमवार दिनांक 26 मे 25 रोजी दुपारी 2:30 वाजता वीज कोसळून जागीच मृत्यू पाईट येथे भामा आसखेड धरणाच्या कडेला रौंधळवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये मौजे वेताळे येथील संतोष गुलाब खांडवे या तरुणाच्या अंगावर मासेमारी करत असताना वीज कोसळून जागीच मृत्यू झाला आहे. सदर युवकाचा मोबाईल सह अंगावरची कपडे विजेमध्ये जळून खाक झाली पूर्ण एक साईड डोक्यापासून तर पायापर्यंत उजवी साईड जळलेल्या अवस्थेत आढळून आली. सदर मुलाला मृत अवस्थेत त्याच्या मित्रांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पाईट या ठिकाणी आणले असता त्याला पुढील कार्यवाहीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी तत्काळ पाठविण्यात आले. सदर घटनेचा तात्काळ पंचनामा पाईट मंडल अधिकारी एम एस सुतार, ग्राममहसूल अधिकारी पाईट एम.जी. क्षीरसागर, ग्रामपंचायत अधिकारी पाईट ए. एन. फुलपगर, जयसिंग दरेकर मा. उपसरपंच , दिपक डांगले, अनिल रौंधळ, विपुल खेंगले, कबीर रौंधळ, हरिभाऊ रौंधळ, नवनाथ डांगले आदी उपस्थित होते.मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी तसेच पाईट या ठिकाणी कमीत कमी पाच किलोमीटर अंतरापर्यंत रेंज असणाऱ्या वीज प्रतिबंधक टावर बसवण्याची मागणी जयसिंग दरेकर यांनी केली आहे.
Share this content:
