
प्रतिनिधी – सचिन राक्षे
शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य खेड तालुका महिला आघाडीच्या पश्चिम विभाग उपाध्यक्षपदी सौ. विजया बाळकृष्ण पाटोळे यांची निवड चाकण येथील संघटनेच्या कार्यालयात करण्यात आली. यावेळी शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवश्री भरतशेठ पवळे, संस्थापक सचिव शिवश्री मनोहर गोरगल्ले, संस्थापक कार्याध्यक्ष शिवश्री सचिनभाऊ राक्षे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शिवश्री चंद्रकांत अण्णा खैरे , महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्षा सौ रेणुका ताई मारुती मासेकर, शिवश्री निलेशभाऊ वाघमारे पुणे जिल्हा सचिव, तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवश्री बाळकृष्ण पाटोळे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री भरत पवळे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे अवचित्य साधून सौ. विजयाताई बाळकृष्ण पाटोळे यांची आज नियुक्ती करण्यात आली. सौ.विजयाताई बाळकृष्ण पाटोळे यांनी याआधी जय शिवशंभो तरुण मित्र मंडळ नवरात्र उत्सव समिती यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन महीलांच्या एकजुटीने नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला आहे. त्यांना समाजकार्याची आवड असून भविष्यात खेड तालुक्यातील महिलांना शिवशंभू छावा प्रतिष्ठानच्या माध्यमातून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्यांची पश्चिम विभाग महिला आघाडी उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे जेष्ठ शिवसैनिक श्री. अशोक भाऊ मुके यांनी शिवसेनेच्या खेड येथील कार्यालयात बोलावून त्यांचा सन्मान केला. सौ.विजयाताई बाळकृष्ण पाटोळे यांची खेड तालुका महिला आघाडीच्या पच्छिम विभाग उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे फोन द्वारे व व्हाट्सअप द्वारे खेड तालुक्यातील सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे
Share this content:
