
प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ, मुंबई संघाचा आज रविवार, दि.२०/०७/२५ रोजी भव्य कामगार मेळावा श्रेया लॉन्स, चाकण येथे हजारो कामगारांच्या उपस्थितीत पार पडला, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.राज्यमंत्री, आमदार सचिनभाऊ अहिर, खेड -आळंदी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री बाबाजीशेठ रामचंद्र काळे यांनी यावेळी कामगारांना मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर भाषणात बोलले की, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ फक्त महाराष्ट्र पुरता मर्यादित राहिला नसून महाराष्ट्राबाहेरही या संघाचे काम चालू आहे, अनेक संघ येतात आणि जातात पण संघ टिकवता आला पाहिजे व त्यामाध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवता आले पाहिजे , तसेच कंपनी जगली पाहिजे आणि त्यासोबतच कामगारही जगला पाहिजे असे धोरण ठेवून आपण सगळे प्रश्न सोडवणार आहोत अशी भावना व्यक्त केली तसेच कामगारांचे प्रश्न व अडचणी ऐकून त्यावर योग्य पर्याय काढून कामगारांना न्याय मिळवून देणार असेही आश्वासन सचिनभाऊ अहिर यांनी यावेळी कामगारांना दिले, तरी सदर मेळाव्यास उपाध्यक्ष राजन लाड, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोकराव खाडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास (आबा) धनवटे, जिल्हा संघटिका विजयाताई शिंदे, निवृत्ती देसाई, सुनील अहिर, संजय कदम, उत्तम गीते ,मिलिंद तांबडे, विजय काळोखे व कामगार उपस्थित होते.
Share this content:
