प्रतिनिधी – कल्याण गाडे
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या प्रस्तावित कचरा संकलन केंद्राविरोधात टाकळकरवाडी व जऊळके खुर्द ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका क्र ९९६४/२०२५ दाखल केली असून न्या.एम.एस. कर्णिक व न्या.एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होऊन प्रतिवादी महसुल व वन विभाग महा.राज्य,जिल्हाधिकारी पुणे,मुख्य कार्यकारी अधिकारी राजगुरुनगर नगरपरिषद,प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांना न्यायालयाने नोटीसा जारी करून पंधरा दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड.तेजपाल इंगळे,ॲड वसिम सामलेवाले यांनी गायरान जागा सार्वजनिक उपक्रमासाठी देताना ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागते ती घेतलेली नाही,तसेच संबधित गावे राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीत येत नाही हे मा.न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.शासन व जिल्हाधिकारी पुणे यांचेवतीने सहा.सरकारी अभियोक्ता ॲड.अश्विनी पुरव यांनी बाजु मांडली. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या कचरा संकलन केंद्राला शासन ज्ञापनानुसार जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे,बाजार समितीचे मा.संचालक कैलासराव टाकळकर,टाकळकरवाडीच्या सरपंच शीतल टाकळकर,जऊळके खुर्दचे मा सरपंच सुभाषराव बोऱ्हाडे, राजुशेठ खंडीझोड,प्रकाश पवार,राजाराम टाकळकर,शिवाजी बोऱ्हाडे,बबनराव बोऱ्हाडे,गीताराम टाकळकर,शरद टाकळकर,बाळासाहेब बोऱ्हाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे व मंत्रालय मुंबई येथे पाठपुरावा करून याचिकेसाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून ग्रामस्थांच्या वतीने रिट याचिका दाखल केली.पत्रकार परिषदेस वरील मान्यवरांसह केशव बोऱ्हाडे,तुकाराम बोऱ्हाडे,स्वप्नील बोऱ्हाडे उपस्थित होते.जिल्हाधिकारी पुणे यांनी आदेशात ग्रामसभेने प्रकल्पास विरोध केला असून गटविकास अधिकारी खेड यांच्या शिफारशीनुसार पुढील कार्यवाही केल्याचे नमुद केले होते. कायद्यानुसार ग्रामसभेच्या मान्यतेशिवाय शासनाला शासकीय वा सार्वजनिक उपक्रमासाठी गायरान जागा घेता येत नाही ही बाब महत्वपुर्ण असल्याने मा.उच्च न्यायालयाने दखल घेतली असल्याने निश्चितच न्याय मिळेल.जलस्रोत दुषित होण्याचा धोका व प्रदुषण वाढणार असल्याने ग्रामीण जनजीवनावर परिणाम होणार असल्याने व ग्रामस्थांना विश्वासात न घेता प्रकल्प लादलेला असल्याने जोपर्यंत कचरा संकलन केंद्र शासन हलविणार नाही तोपर्यंत लढा सुरू राहील .कृपया मा.उच्च न्यायालय आदेशाची दखल घेऊन न्याय द्यावा ही विनंती.आपले कृपाभिलाषी कचरा संकलन केंद्र विरोधी कृती समिती टाकळकरवाडी, जऊळके खुर्द ता.खेड.जि.पुणे
Share this content:
