

प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
कनेरसर येथील जि.प.प्राथमिक शाळा-कनेरसर, जालिंदरनगर, दौंडकर वस्ती, हजारेवस्ती, ठाकरवाडी,अंबिका विद्यालय येथील सुमारे ७५० शालेय विद्यार्थ्यांना श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने वह्या वाटप करण्यात आल्या.या वह्या वाटप प्रसंगी कनेरसर चे भूमिपुत्र, माजी सैनिक, महागणपती देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष संदिप तुकाराम दौंडकर,सचिव डॉ. तुषार बाळासाहेब पाचुंदकर, व्यवस्थापक संतोष रणपिसे ,अकाऊटंट पांडुरंग चोरघे,कनेरसर चे माजी उपसरपंच जवाहर विठ्ठल दौंडकर, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे सरचिटणीस सत्यवान दौंडकर, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन नरेश साहेबराव दौंडकर,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत धोंडीभाऊ म्हसुडगे,चांगदेव सोपान झोडगे,संतोष संपत दौंडकर, अजय हजारे,निलेश संभाजी दौडकर,मारूती दौंडकर अंबिका विद्यालय शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सागर धोंडीभाऊ म्हसुडगे,जि.प.प्राथमिक शाळा कनेरसर चे अध्यक्ष गणेश भाऊसाहेब माशेरे ,व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, ग्रामस्थ, कनेरसर जि.प.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अंजली शितोळे,उपक्रमशील शिक्षिका श्रीम. सारिका राक्षे,श्रीम.शुभांगी जाधव,लक्ष्मण मिडगुले,नितीन दिघे,अंबिका विद्यालयचे मुख्याध्यापक,दत्तात्रय कुमकर, माजी मुख्याध्यापक मनोहर वाघमारे,श्रीम.गंगासागर फड मॅडम, श्रीम. शितकल मॅडम, श्रीम.हवालदार मॅडम,श्रीम.पुजा बोरकर मॅडम, सर्व शिक्षक वृंद,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष संदिपराव दौंडकर होते.तर प्रमुख पाहुणे,सचिव डाॅ. तुषार पाचुंदकर होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबिका विद्यालय कनेरसर चे मुख्याध्यापक दत्तात्रय श्री.कुमकर यांनी केले,सुत्रसंचालन श्रीम.गंगासागर फड मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे यांचा सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तर आभार कनेरसर जि.प.प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम. सारिक राक्षे मॅडम यांनी मानले.
Share this content:
