प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
दि.3 डिसेंबर जगभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने समाजातील दिव्यांग बांधवांचा सन्मान त्यांचे समस्यांचे निराकरण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे.
मा. अमोल जंगले गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती खेड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राक्षेवाडी येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. मा. सोनाली झिंजुर्डे विस्ताराधिकारी (शिक्षण) तसेच मा. मंजुषा पोखरकर केंद्रप्रमुख हे उपस्थित राहून कार्यक्रमास प्रेरणा दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले, दिव्यांग विद्यार्थ्यांना वह्या पेन्सिल देण्यात आले. श्री शेख ए.ए. विशेष शिक्षक, श्री आप्पाने डि एन विशेष शिक्षक, श्री. जाधव व्ही.डी. विषय तज्ञ यांनी मार्गदर्शन केले. गावात विद्यार्थ्यांची समाजात जनजागृती व्हावी यासाठी घोषवाक्य देत प्रभात फेरी काढण्यात आली. मुख्याध्यापक, श्रीम. म्हसुडगे, श्री.लाडके, श्रीम.जाधव, श्रीम.हांडे, श्री.काठे, श्रीम.धादवड, श्रीम.पवळे, शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरित्या साजरा करण्यात आला .
Share this content:
