प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
“घुंगरू”
तृप्ती फिल्म निर्मात घुंगरू हा चित्रपट सुप्रसिद्ध तमाशा कलावंत दिवंगत अशोक पेटकर
यांना समर्पित केला याचा मनस्वी आनंद आहे.
चित्रपटाची कथा सामाजिक विशमतेवर प्रकाशझोत टाकणारी असून चित्रपटात सत्यवती, थोरले सरकार,आर.के., राजेन्द्र मोरे, बाबाजी कोरडे यांनी भुमिकांना योग्य न्याय दिला.
तमाशा फड मालक आबासाहेब काळे व्यक्तीरेखा
जगले याचा मनस्वी आनंद आहे.संगीत रत्न मा.दत्ता महाडिक पुणेकर तथा अण्णा यांच्या तमाशात रमेश खुडे यांना भुमिका करताना पाहिलं होतं आज घुंगरू चित्रपटात त्यांना पहाताना अनेक आठवणी डोळ्यासमोर आल्या.चित्रपटातील प्रत्येक लावणीवर लावण्यवतीणी रंगमंचावर उभं केलेलं इंद्र धनुष्य मणाला मोहुन टाकणारं आसुन नाच्याच कामं करणारा कलावंत विशेष अभिनंदनास पात्र आहे.
तमाशा कलावंतावर प्रेम व्यक्त करणारे गावकरी यांच्या भुमिका करणारे कलावंतांना आभाळभर शुभेच्छा.माझे वडील लेखक नाथा मास्तर घोडेगावकर यांचे परम स्नेही रामदास राऊत यांच्या रुपाने महाराष्ट्राला ताकदीचा लावणीकार मिळाला याचा मनस्वी आनंद आहे. हिरे,माणिक मोत्यासारखे कलावंतांची सुंदर हारामध्ये गुंफण करून रसिकांना समर्पित करण्याचं अलौकिक कार्य रामदास राऊत सर यांच्या कडुन अविरत घडत राहून सर्व
कलावंतांना वडील लेखक नाथा मास्तर घोडेगावकर यांचे आशिर्वाद मिळावेत या शुभेच्छा.
आपला स्नेहांकित
श्री. सुधीर (भाऊ) नाथा वैरागर
मु.पो.घोडेगांव,ता.नेवासा,
जिल्हा -अहिल्यानगर
Share this content:
