


प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
सोमवार दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त भैरवनाथ विद्यालय, वाकी बुद्रुक येथे गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस केवळ एका महान व्यक्तीची जयंती नसून, गणिताच्या सामर्थ्याची, तर्कशक्तीची आणि सर्जनशील विचारांची प्रेरणा देणारा आहे.श्रीनिवास रामानुजन हे जगप्रसिद्ध भारतीय गणितज्ञ होते. औपचारिक शिक्षणाची मर्यादा असूनही त्यांनी संख्या सिद्धांत, अनंत श्रेणी, बीजगणित, त्रिकोणमिती अशा अनेक क्षेत्रांत अतुलनीय कार्य केले. त्यांच्या संशोधनामुळे आजही आधुनिक गणित आणि विज्ञान क्षेत्राला दिशा मिळते. रामानुजन यांचे जीवन विद्यार्थ्यांना हे शिकवते की जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणतीही मर्यादा ओलांडता येते.गणित दिन साजरा करण्यामागील मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये गणिता विषयी आवड आणि आत्मविश्वास निर्माण करणे तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि समस्या सोडविण्याची कौशल्ये विकसित करणे गणिताचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध समजावून देणे रामानुजन यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन नवनवीन शोधांची प्रेरणा मिळवणे गणित हा केवळ गुण मिळविण्याचा विषय नसून तो विचार करण्याची पद्धत आहे. गणितामुळे आपली निर्णयक्षमता वाढते, शिस्त लागते आणि जीवनातील अडचणी सोडविण्याची ताकद मिळते.रामानुजन यांच्यासारखे महान शास्त्रज्ञ हे याच गणिताच्या बळावर घडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता गणिताचा आनंद घ्यावा, प्रश्न विचारावेत, सराव करावा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा.गणित दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना हे समजावून सांगण्यात आले की “गणित म्हणजे यशाची किल्ली” आहे. रामानुजन यांची जयंती ही प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते व शाळेचे शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध होते.या जयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी जागृती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, श्री.लक्ष्मणराव शंकरराव टोपे साहेब सर्व शिक्षक- शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. श्री.साहेबराव भालेकर (मुख्याध्यापक) भैरवनाथ विद्यालय वाकी बुद्रुक ता- खेड,जि- पुणे.
Share this content:
