यप्रतिनिधी-डाॅ.देवेंद्र ओव्हाळ
दि.16 फेब्रुवारी 2026 रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चिखलगाव ता.खेड येथे इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा सन 2025-26 सदिच्छा समारंभ भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली.विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणी सांगताना शिक्षक आणि शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.प्रबोधनकार प्रा.सुधाकर अभंग यांचे शुभेच्छापर मार्गदर्शन व्याख्यान संपन्न झाले.मोठी स्वप्ने पाहणारेच सत्यात उतरवतात.भविष्यात प्रत्येकाने मोठ्या यशाची शिखरे गाठावीत.शिक्षणानेच माणूस मोठा व सुसंस्कृत होतो अशा पद्धतीने अनेक थोरा मोठ्यांची उदाहरणे दाखले देऊन बहुमोल असे मार्गदर्शन केले.शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून विविध शालेय उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले जात आहेत.शाळेमध्ये ई-लर्निंग सुविधेद्वारे शिक्षक डिजिटल साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकवत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक योगेश वाघुले होते तर प्रमुख अतिथी चिखलगावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ.शोभाताई गोपाळे, ग्रा.पं.सदस्या उर्मिलाताई बांगर,
माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे,प्रबोधनकार प्रा.सुधाकर अभंग, डेहणे कॉलेजचे प्राचार्य अशोक भागवत, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रामचंद्र चोपडे, अधिक्षक प्रवीण ननावरे, अधिक्षिका श्रद्धा सरकटे व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हौसीनाथ बंडगर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा मांजरे यांनी केले व आभार श्री.नरेंद्र बोरदे यांनी मानले.
Share this content:
