प्रतिनिधी- अमोल गायकवाड वडगाव निंबाळकर येथील ज्या मातांनी खडतर परिश्रम घेऊन आपली मुले उच्चशिक्षित केली, त्या मातांचा सन्मान आपण केला.ज्या मातांनी एका मुलीवरती कुटुंब नियोजन करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.अशा मातांचा सत्कार केला. अशा अनेक गोष्टी वडगाव निंबाळकरच्या ग्रामपंचायत मार्फत केल्या जातात. हे कार्य त्यांचे कौतुकास्पद असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी वडगाव निंबाळकर येथील महिला सन्मान समारंभ व महिला बचत गटाच्या मालाचे विक्री व प्रदर्शन या कार्यक्रमांमध्ये वरील विधान केले आहे.बारामती ताक्यातील वडगाव निंबाळकर येथील महिला दिनाचे औचित्य साधून वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतच्या वतीने महिला सन्मान समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रोहिणी जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका प्रणिती खोमणे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या महिला अध्यक्षा ज्योती लडकत, माधवी तुपे ,नीता फरांदे ,भारतीय जनता पार्टीच्या बारामती तालुक्याच्या महिला अध्यक्षा सारिका आटोळे, बारामती तालुका दूध संघाच्या संचालिका शोभा जगताप ,नीरा मार्केट कमिटीच्या संचालिका शरयु वाबळे ,बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालिका सोनाली जायपत्रे, होळ गावठाण च्या सरपंच छाया भंडलकर, रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा कांचन काटे व महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य सरपंच सुनील ढोले सदस्य अजित भोसले, संजय साळवे,राहुल आगम संतोष दरेकर,महिला सदस्या सारिका खोमणे,स्वाती हिरवे,राजश्री साळवे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.यावेळी वडगाव निंबाळकर आणि पंचक्रोशीतील विविध महिला बचत गटामार्फत खाद्यपदार्थ विक्रीस ठेवण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा भंडलकर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदस्या अश्विनी खोमणे तर आभार सदस्या प्रेमलाचा रांगोळी यांनी मानले

Share this content:
